नवीन पाय बसविणे बरोबर जुन्या कृत्रीम पायाची दुरुस्ती देखील सदर शिबीरामध्ये मोफत करण्यात येईल. याचबरोबर दिव्यांगांकरीता आवश्यक तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, वाकर ,एलबो स्ट्रिक कॅरचपेअर इत्यादी साहित्याचे मोफत वाटप देखील शिबीर कालावधीत करण्यात येणार आहे. सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थीना श्री. साईबाबा संस्थान मार्फत राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
याशिबीरासाठी येताना आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र अपंग प्रमाणपत्र , राशन कार्ड दोन प्रती मध्ये झेरॉक्स करून आणि ०२ पासपोर्ट साईज फोटो सोबत घेवुन यावेत.नावनोंदणी करीता
श्री. साईनाथ रुग्णालय शिर्डी-०२४२३-२५८५५५ येथे संपर्क करावा. या शिबिराचे ठिकाण श्री साईनाथ रुग्णालय, २०० रुम शिर्डी येथे राहणार आहे. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments