*मराठी पत्रकार दिनानिमित्त दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार संतोष बोरुडे यांचा जाहीर सन्मान*



कामरगाव वार्ताहर :
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक नवराष्ट्रचे कामरगाव डेडलाईन्सचे वार्ताहर पत्रकार संतोष किसन बोरुडे यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.


स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान, कामरगाव (ता. नगर, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निर्भीड, सत्यनिष्ठ व जनहितकारी कार्य लक्षात घेऊन हा गौरव प्रदान करण्यात आला. समाजातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत सत्य बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कातोरे उपस्थित होते. यावेळी गोरख जाधव, संतोष शिंदे, अमन शेख, संभाजी गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान स्वीकारताना पत्रकार संतोष बोरुडे यांनी सांगितले की, “पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताची व सत्याची बाजू मांडणे हेच माझे कर्तव्य असून, हा सन्मान अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.”

Post a Comment

0 Comments