टाकळीभान प्रतिनिधी - याबाबत अधिक माहिती अशी की,जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या प्रचारासाठी बारामती येथे विमान लँड होत असताना अजितदादा पवार यांच्या विमानाचा सकाळी नऊ सव्वानऊ वाजताच्या सुमारास अपघात झाला.
त्यामध्ये अजितदादा पवारांसह पाच ते सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएकडून जाहीर करण्यात आली आहे.
एक डॅशिंग व्यक्तिमत्व,काम होणार असेल तर होणार अन् नाही तर नाही असे रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात अजितदादांची ओळख होती.
0 Comments