तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाचे गोदाम पाडण्याचे काम सुरू, लोखंडी इंगल कंकराळा येथील प्रगती जिनिंगवर, चर्चेला उधाण --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०८-- सोयगाव तहसील कार्यालय अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागाच्या गोदाम पाडण्याचे काम सुरू असून यातील लोखंडी इंगल धोकादायक अवस्थेत ट्रॅक्टर द्वारे कंकराळा येथे असलेल्या प्रगती जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित सोयगाव तालुका, या ठिकाणी दि.२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाखो रुपयांचे लोखंड हे कंकराळा येथील प्रगती जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेवर कशाच्या आधारावर नेण्यात आले असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय मालमत्तेचे रक्षण करणार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी असलेल्या नियोजित जागेच्या ठिकाणी तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे धान्य गोदाम होते. गोदाम पाडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने गोदाम पाडण्याचे काम सुरू आहे. गोदामावरील पत्रे व लोखंडी इंगल असा लाखो रुपयांचे भंगार या गोदामात निघत आहे.पत्रे कुठे ठेवण्यात आले याचा खुलासा नगरपंचायत व तहसील कार्यालय करीत नसल्याने शासकीय मालमत्तेचे रक्षण करणार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोदामचे भंगार ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात जागा उपलब्ध असताना गोदामाचे इंगल ट्रॅक्टर द्वारे कंकराळा येथे असलेल्या प्रगती जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित सोयगाव तालुका या ठिकाणी का नेण्यात आले. गोदामाचे भंगार ही शासकीय मालमत्ता आहे. या शासकीय मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली का ? याबाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग हात वर करीत असल्याने शासकीय मालमत्तेचे रक्षण बाबत जनतेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर कारवाई करणार कोण हे मात्र निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments