विजय बोडखे
राजुरीत 21 तर कोल्हार मध्ये 87 अशा एकूण 108 रक्तकुपिका रक्त संकलन करण्यात आल्या. संपूर्ण भारतभर ४ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ अंतर्गत राहाता तालुक्यातील हे पहिलेच शिबिर यशसवी ठरले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन यजमान म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना संचालक,तसेच राजुरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व राजुरी उपसरपंच डॉ. सोमनाथ बाळासाहेब गोरे,व राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल नाईकवाडी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राजुरी ग्रामपंचायत ग्रामसेविका वैशाली यादवराव तोडमल यांनीही रक्तदान करून समजापुढे एक आदर्श ठेवला.सदर प्रसंगी प्रमुख उपस्थितीसरपंच सौं. सांगिता जालिंदर पठारे,
कर्मचारी मनीषा बनसोडे, अशोक त्रिभुवन, संदीप गोरे, छायाचित्रकार संतोष गोरे.तसेच रामानंद संप्रदायाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ येवले प्रदीप दंडवते विजय जेजुरकर चेतन पालकर संदीप सुरासे रिंकेश जाधव ज्ञानेशवर लांडगे उद्धव यादव अप्पासाहेब यादव बाळासाहेब शिवरकर योगेश पवार दत्तात्रय केदारी दिलीप म्हसे अनि भालेराव स्नेहल शेवाळे मनीषा येवले कल्पना साळुंके वैशाली शिवरकर विमल कडू सविता घेगडमल गौरी शिरोळे शीतल भुसाळ यांच्यासह सेवाकेंद्रातील गुरुबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास बी. डी. ओ. ( गट विकास अधिकारी )मा. श्री. विवेक गुंड साहेब यांनी ही सदिच्छा भेट देऊन सामाजिक कार्याचे कौतुक केले.रक्तदान हे श्रेष्ठदान असून अशा उपक्रमातून समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
छायाचित्र संतोष गोरे राजुरी.
0 Comments