दिलीप शिंदे
सोयगाव दि.२८--छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ बुधवारी सावळदबारा येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात आरोग्य समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पंजाबराव कोलते हे होते. सावळदबारा आर बी एस के चे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश चव्हाण यांनी आरोग्य समुपदेशन कार्यशाळे दरम्यान मार्गदर्शक सूचनेनुसार संतुलित व पौष्टिक आहार व त्याचे दीर्घकालीन फायदे, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी व जग पुढचे दुष्परिणाम, वैयक्तिक स्वच्छता हात धुण्याच्या सवयी स्वच्छ पाणी वापर, स्क्रीन टाईम मर्यादा व डोळ्यांची काळजी, मोबाईल संगणक सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम,व्यसनाधीनतेचे प्रकार व त्याचे दुष्परिणाम व किशोरवयीन आरोग्य समस्या, तणाव भावनिक बदल इत्यादी मुद्द्यांवर उपस्थिती विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य समुपदेशन कार्यशाळा यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments