दिलीप शिंदे
सोयगाव दि.२८-- जिल्हा परिषद आमखेडा गट ओबीसी महिला राखीव असल्याने या गटात तिरंगी लढत होणार असून ही लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. आमखेडा गटात भाजपा कडून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे तर गोंदेगाव गटाच्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या तथा तत्कालीन महिला समाज कल्याण सभापती मोनाली पिता राजेंद्र राठोड या शिवसेना शिंदे गटाकडून आमखेडा गटातून मोनाली अनिलकुमार पवार या नावाने नशीब आजमावत असून बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला इंगळे या स्थानिक असल्याने त्यांनी प्रस्थापितांसमोर आवाहन उभे केले.
आहे. एकीकडे राजकीय वारसा लाभलेल्या सक्षम उमेदवार तर दुसरी कडे शरीराने दिव्यांग पण मनाने सक्षम असलेल्या ऊर्मिला संदीप इंगळे यांनी सत्तेत असलेल्या दोन्ही महिलांच्या विरोधात विकासासाठी शेड्यू ठोकल्याने सर्वसामान्य जनतेकडून उर्मिला संदीप इंगळे यांच्या हिमतीचे कौतुक केले जात आहे. भाजपाला आमखेडा गट राखण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करावे लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महिला बाल कल्याण सभापती मोनाली पवार या बाहेरील असून त्या आमदार सत्तारांच्या उमेदवार असल्याची चर्चा गटातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.प्रस्थापितांच्या विरोधात आमखेडा गटात राजकीय पक्षांसह इतर ही निवडणूक लढविण्यासाठी धजावत नसल्याने पंजा, घड्याळ,तुतारी, मशाल हे चिन्ह आमखेडा गटात दिसेनासे झाले आहे. या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले नसल्याने विविध चर्चांना उधाण आहे. तर स्थानिक असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग असलेल्या महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांनी आजच्या घडीला भाजपा व शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांसमोर आवाहन उभे केले आहे. आमखेडा गट हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने बालेकिल्ला ताब्यात राहावा यासाठी भाजपाला शर्यतीचे प्रयत्न करावे लागणार आहे. सोयगाव सह मतदारसंघात भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातून विस्तव ही जात नसल्याने शिंदे गटाच्या उमेदवार मोनाली अनिलकुमार पवार या बाहेरील असल्याची चर्चा गटातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विधानसभेला घटलेले मतदान भरून काढण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्यापुढे आवाहन उभे राहिले आहे. दोन्ही ही महिला या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या आहेत. आमखेडा येथील रहिवासी असलेल्या दिव्यांग महिला उर्मिला संदीप इंगळे यांनी बहुजन समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली आमखेडा गटातून निवडणूक लढविली असल्याने मतदारांमधून या महिलेच्या हिमतीला दाद दिली जात आहे. दोन माजी जिल्हा परिषद सदस्या यांच्यासमोर या दिव्यांग महिलेने आवाहन उभे केले आहे.प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी ही निवडणूक होणार असून मतदार राजा कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments