धुमश्चक्री, मारहाण प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -नायगाव येथे रविवारी दुपारी झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारानंतर बेपत्ता झालेला निलेश शेंडगे या तरूणाचा मृतदेह आज मंगळवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत, चेतन पेत्रस खाजेकर, वय-२३, रा. वॉर्ड नं.७, श्रीरामपूर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे मामा निलेश शेंडगे यांचे मित्र निलेश जाधव यांना नायगाव येथे जमीन घ्यायची असल्याने चंद्रशेखर आगे यांच्या नातेवाईकांची जमीन पहायला निलेश जाधव व त्यांच्यासोबत अमीत कुटे, दिपक जाधव असे डिझायर गाडीने नायगाव येथे आले. त्यानंतर मामा निलेश एकनाथ शेंडगे व त्यांच्यासोबत शंकर उमाप असे निलेश शेंडगे यांच्या क्रेटा गाडीत दुपारच्या वेळेत आले. जमीन दाखवायला मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी अर्जुन दाभाडे, राहुल धुमाळ, सागर भोसले, विजू पवार, आसिफ
कैची, अकील बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, मेजर राणा व इतर पाच-सहा इसम फॉर्च्यूनर गाडी, स्कॉर्पिओ तसेच इटिंगामधूनआले. त्यानंतर आरोपींनी निलेश जाधव यास येथे जमीन घ्यायची नाही, असे म्हणत एकाने गावठी कट्टासदृश्य हत्यार निलेश जाधवच्या दिशेने रोखले. इतरांनी लाकडी दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. तेव्हा निलेश जाधव यास वाचवायला निलेश शेंडगे हा मध्ये आला असता त्यास लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण करण्यात आली. आपल्या उजव्या डोळयाजवळ एकाने गावठी कट्टयासारख्या वस्तूच्या मागील बाजूने मारहाण करून गळयातील सोन्याची चैन हिसकावून नेली. त्यानंतर आम्ही घाबरून तेथून पळून गेलो. गाड्या तेथेच सोडून पळाल्यानंतर माझा मामा निलेश शेंडगे हा आम्हाला आढळून आला नाही, असे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून अर्जुन दाभाडे, सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजू पवार, अकिल बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, आसिफ कैची व इतर पाच ते सहा अनोळखी इसमांविरूद्ध तालुका पोलिसात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डिवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोनि. धनवडे हे करीत आहेत.दरम्यान,


चौकट-
या मारहाणीच्या प्रकारावेळी निलेश शेंडगे, रा.नेवासा हा
तरूण बेपत्ता झाला होता.रविवारपासून त्याचा शोध
सुरू होता. आज निलेश शेंडगे याचा मृतदेह आढळून आला.त्यामुळे खळबळ उडालीआहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून पोलीस मृतदेहाची तपासणी करून पुढील कारवाई करतील,अशी माहिती डिवायएसपी जयदत्त भवर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments