राहाता (प्रतिनिधी)
राहाता येथील पंचायत समिती बांधकाम येथील अनिल इंदोलीया यांच्या वर कार्यवाही व्हावी म्हणून छावा ब्रिगेड चे आज पासून राहाता पंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूराहाता पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री अनिल इंदोलीया यांनी शासन भरतीवेळी दिलेल्या कागदपत्राची तपासणी करून त्यांनी केलेल्या कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे म्हणून त्या कामाची कोर टेस्टिंग करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन छावा ब्रिगेडचे राजेश शिंदे पाटील यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे केली होती विभागीय आयुक्त यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग यांना कारवाईची करण्याची नोटीस दिली परंतु आजतागायत कुठलीही कारवाई झालेली नाही इंदोलीया हे संगमनेर येथे कार्यरत असताना काही सामाजिक पदाधिकारी यांनी त्यांच्या विरोधात बऱ्याचशा तक्रारी केल्या होत्या परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही म्हणून श्री शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच गटविकास अधिकारी राहाता पंचायत समिती यांना निवेदन दिले व दिनांक १२ जानेवारी २०२६ पासून राहाता पंचायत समिती समोर आमरण उपोषण चालू केले आहे जोपर्यंत योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे छावा चे राजेश शिंदे यांनी माहिती दिली उपोषणास गणीभाई शेख, महेश बरवंड,रेवणनाथ खाडे, संभाजी थोरात मनसे चे गणेश जाधव,दत्तू बावके, संजय हजारे आदी उपस्थित होते.
0 Comments