जय मल्हार आरती मंडळ यांनी दर रविवारी दुपारी आरती नंतर भाविकांना भोजन प्रसाद अन्नदाते यांच्या वतीने दोन वर्षांपासून सुरू केला आहे विवाह सोहळ्याचे आयोजन हे देखील जयमल्हार आरती मंडळ यांच्या संकल्पनेतून चालू आहे

सत्तेचा महासंग्राम न्यूज नेटवर्क 
वाकडी खंडोबाची तालुका राहाता येथे सालाबादप्रमाणे श्री खंडोबा महाराज व म्हांळसाबाई यांचा विवाह सोहळा हजोरो भाविक भक्त व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

यावेळी तालुक्यातील तसेच नासिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील भाविक भक्त विवाहस हजर राहून देवाचे लग्न लावलेचा आंनद घेतला यासाठी अनेक भाविक भक्तांनी मदत केली काल नेवासा येथील म्हांळसाबाई. मंदिरात पुजा करुन हळदीसाठी म्हांळसाबाईची मिरवणूक काढून वाकडी येथे आणले व सायंकाळी मोठ्या उत्साहात हळदीचा कार्यक्रम झाला व आज शनिवार दिनांक 3/1/2026 रोजी गावातील हनुमान मंदीरात देवाचे दर्शन वाद्य संगीत वाजवून मिरवणूक काढली व दुपारी 12/30 वाजता लग्न लावले आरती करण्यात आली व नंतर सर्वांना भोजन प्रसाद देण्यात आला याचे नियोजन श्री खंडोबा महाराज आरती मंडळ श्री खंडेराव देवस्थान ट्रस्ट श्री खंडोबा भाऊबीज मंडळ जय मल्हार पायी दिंडी मंडळ शिव मल्हार वाघे मंडळ चंपाषष्ठी नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने विवाह सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे वाकडीच्या श्री खंडोबा देवाला राज्यभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात जेजुरीचा नवस येथे फिटला जातो अशी पुर्वीपासून कल्पना आहे.
 हा नवसाला पावणारा देव म्हणून ओळखले जातात वर्षातून दोन यात्रा उत्सव होतो मार्गषीश चंपाषष्ठी व चैत्र पोर्णीमा अशा दोन यांत्रा व वर्धापन भाऊबीज या दिवशी सामुदायिक जागरण गोंधळ हजोरो घट भरून कार्यक्रम साजरा होतो तसेच सोमवती अमावास्याला पुणतांबा येथे पालखी सोहळा व श्रावण शेवटच्या रविवारी भंडारा व किर्तन कार्यक्रम साजरा पुर्वीपासून केला जातो तसेच आधिक मास महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण मल्हारी मार्तंड पारायण व अंखड हरीनाम सप्ताह साजरा केला जातो वाकडीचा जागरूत देवस्थान हे राज्यात प्रसिद्ध आहे.
यासाठी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ यांचे सहकार्य लाभते.

Post a Comment

0 Comments