या पायी दिंडी सोहळ्यामध्ये दररोज काकडा ,भजने, प्रवचन, हरिपाठ, आरती, कीर्तन, आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम कोकमठाण येथे सहा जानेवारी रोजी राहणार आहे. सात जानेवारीला पोहेगाव तर आठ जानेवारीला पांगरी येथे दिंडीचा मुक्काम राहणार असून 9 जानेवारीला सिन्नर तर 10 जानेवारीला नाशिक रोड येथे हि पायी दिंडी मुक्कामी थांबणार आहे. 11 जानेवारी रोजी सातपूर तर 12 जानेवारीला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथे या पायी दिंडीचा मुक्काम राहणार आहे. 13 जानेवारी रोजी त्रिंबकेश्वर येथे दिंडी पोहचून मुक्काम होणार आहे. 14 व 15 जानेवारी रोजी दिंडी सोहळा त्रंबकेश्वर येथे मुक्कामी राहणार आहे.13 ते 15 जानेवारी 2026 या कालावधी दिंडी विसाव्याचे ठिकाण पेट्रोल पंपाशेजारी हरी ओम ,धाब्याच्या पाठीमागे, त्रिंबकेश्वर येथे राहणार आहे. 14 जानेवारी रोजी ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांचा एकादशी निमित्त सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी नऊ ते 11 या दरम्यान हभप संजयजी महाराज जगताप यांचेच काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर एड. प्रमोद दादा मुरलीधर जगताप यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे. दिंडीमध्ये येताना बिछाना आणावा. मौल्यवान वस्तू आणू नये. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून या दिंडी सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांचे व समस्त गावकरी मंडळी आणि समस्त भजनी मंडळींचे सहकार्य व योगदान राहणार आहे. असे या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments