टाकळीभान प्रतिनिधी : जर्मन बेकरी बाँम्ब स्फोटाप्रकरणी बंटी जहागीरदार यांचा कुठलाही संबध नाही. जंगली महाराज रस्त्यावर जर्मन बेकरीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये जहागीरदार विरूध्द कुठलेही सबळ पुरावे मिळाले नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले असल्याचे बंटी जहागीरदार यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी सांगीतले.
पुढे बोलताने ते म्हणाले की, १३ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बाँम्ब स्फोटाप्रकरणी मिर्झा बेग, मोहसिन चौधरी, यासिन भटकल,रियाज भटकल, फय्याज कागझी व जैबुद्दीन अन्सारी या सात आरोपींचा समावेश होता. या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांचे नाव बदनामीच्या उद्देशाने गोवण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाने १ ऑक्टोंबर २०१५ च्या आदेशात या झालेल्या बॉम्बस्फोटात बंटी जहागीरदार विरूध्द कुठलेही सबळ पुरावे दिसून येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले असल्याचे रईस जहागीरदार यांनी सांगीतले.
0 Comments