विजय बोडखे
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व रामानंद संप्रदायाचे वतीने रुग्णांची गरज लक्षात घेऊन हे जीवनदान महा कुंभ रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहे जिल्हाभरात 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत विविध ठिकाणी शिबिरे होणार आहेत बुधवार दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी येथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्त संकलित केले जाणार आहे .
संकलित करण्यात आलेले रक्त शासकीय रक्तपेढीना देण्यात येणार आहे यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांनी तरुणांनी महिलांनी व युवा युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे
रक्तदानाचे फायदे रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणारे पेशींना प्रेरणा मिळवून 48 तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते रोगप्रतिकार शक्ती वाढते नियमित तीन ते चार महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब कर्करोग हृदय विकार होण्याचे प्रमाण कमी होते
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान
मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे परंतु रक्तदानाने कोणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजात मायक्रोसाईटिक ऍमेनिया सिकलसेल थैलेसेमिया हिमोफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फिलीवर अशा गंभीर आजाराशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता आपले फक्त पाच मिनिटे आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटाची असली तरी एका थेंबामुळे एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो एखादे बालक नव्याने श्वास घेते तर एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येतो असे हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे.
0 Comments