माजी मुख्याध्यापक कै. भागुनाथ सांगळे यांचा आज 26 डिसेंबरला द्वितीय पुण्यस्मरण असल्याने त्यांचे चिरंजीव निलेश सांगळे व नातू साई निलेश सांगळे व सांगळे परिवाराच्या वतीने हा द्वितीय पुण्यस्मरण दिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. निलेश सांगळे व साई सांगळे यांनी शुक्रवारी 26 डिसेंबर 2025 रोजी सावळविहीर बुद्रुक जि.प. केंद्र शाळेतील सावळीविहीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री हनुमान क्लास प्राथमिक शाळा कारवाडी, तसेच ईनामके वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सावळीविहिर वाडी येथील शाळेतील मुलांना नाश्ता पाकीटे देण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच गणेश कापसे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आगलावे, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कै. मुख्याध्यापक भागूनाथ सांगळे हे अनेक वर्ष या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
त्यामुळे त्यांचा शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्याशी चांगला संपर्क होता.मुख्याध्यापक असल्याने शाळेतील त्यांची शिस्त यांचा आदर्श हा शिक्षकांच्या आजही उपयोगी पडत आहे. असे यावेळी सौ पाचरकर मॅडम यांनी सांगितले. सावळीविहीर गावातील शाळेतील मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रेसर यांनी यावेळी कै.सांगळे सर यांना श्रद्धांजली वाहिली तर इनामके वस्ती येथे पडेकर सर यांनी कै. सांगळे सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी काही पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments