वाचन कट्ट्यातून विद्यार्थ्यांनी घेतले वाचनाचे संस्कार




लोहगाव(वार्ताहर) : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांचे बालपण आणि आरोग्य धोक्यात येत असताना, वाचन व वाचनाची सवय हीच त्यावरची प्रभावी उपाययोजना असल्याचे प्रतिपादन राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी केले. 
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयात नुकतेच वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. या व्यवसाय मार्गदर्शन व वाचन कट्ट्याचे उद्घाटन राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पावसे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून वाचनातूनच सुसंस्कार, विचारशक्ती व सुदृढ संस्कृती घडते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली, तर समाजात आणि संस्कृतीत निश्चितच सकारात्मक क्रांती घडून येईल. 
मुक्त वाचन हा शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाकडे प्रवृत्त करणारा उपक्रम स्तुत्य, अनुकरणीय असल्याची व या वाचन कट्ट्यातून विद्यार्थ्यांनी संस्कार घ्यावीत. अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे, कन्या विभागाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्या अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, डॉ. शरद दुधाट, संजय डुबे, संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे, माधुरी वडघुले आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख विलास गभाले यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका संगीता उगले, शैलेजा सातपुते, प्रफुल्ल नव्हाळे, विजयाश्री कदम, नंदादेवी बैसाणे, सुजाता ठाकरे, कमल थिटे, दिपाली आंबेकर, मिनाक्षी गांगुर्डे, सुवर्णा भोसले, प्रमिला पंडोरे, शीतल दिवेकर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments