आदिवासी महिलांवर प्राण घातक हल्ला करून विनयभंग

सत्तेचा महासंग्राम न्यूज (डिजिटल मिडिया)

(  पोलीस अधीक्षकांना निवेदन महिलांचा प्रचंड आक्रोश)

श्रीगोंदा येथे आदिवासी भिल्ल महिलांवर प्राण घातक हल्ला करून या महिलांचा विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला असताना असा गंभीर प्रकार घडला असतानाही पोलीस प्रशासन आरोपींवर कारवाई का करत नाही असा प्रश्न आदिवासी संघटनांनी उपस्थित केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी विद्रोही आदिवासी महासंघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या गंभीर घटनेला वाचा फोडली आहे. 
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात, विद्रोही आदिवासी महासंघाचे अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन अंतर्गत काष्टी गावातील संतवाडी येथे ऊस तोडणी मजूर मुकादम संगीता प्रकाश वाघ या 18 मजुरांना घेऊन ऊस तोडणीचे काम करत होत्या, दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दीपक माणिकराव भोसले हा महिला मुकादम संगीता वाघ यांच्याकडे येऊन माझ्या शेतातील मिरचीचे झाड कोणी तोडले अशी विचारपूस करून तुम्ही भिल्टे लय मारलेत पोट भरायला आले तर नीट आई घाला असे म्हणून संगीता वाघ यांना चापटीने मारहाण करू लागला त्यावेळी तेथे उपस्थित कामगारांनी सोडवा सोडव केली त्यानंतर त्या व्यक्तीने गावातील त्याच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रांना बोलावून घेतले त्यानंतर काही मोटरसायकल व चार चाकी वाहनातून आलेल्याअंदाजे 70 ते 80 जणांच्या टोळक्यांने लाट्या काठ्या , लोखंडी दांडक्यांनी शेतामधील काम करत असलेल्या ऊस तोडणी मजूर महिला व पुरुषांवर जीव घेणा हल्ला केला तसेच महिलांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडून नग्न करण्याचा प्रयत्न केला तसेच बलात्कार करण्याच्या उद्देशाने उसात ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्या बेदम मारहाणी मुळे अनेक मजूर बेशुद्ध झाले त्यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनची पोलीस गाडी आली तरीही पोलिसांसमोर मारहाण चालूच होती त्या मारहाणी मध्ये अनेक मजूर बेशुद्ध झाले होते .त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यापासून सोडवनुक करून संगीता वाघ व त्यांचा सख्खा भाऊ अनिल रंगनाथ पवार यांना पोलीस गाडीमध्ये घेऊन गेले व त्यांच्यावर हल्ला झाला असतानाही पोलिसांनी त्यांनाच जेलमध्ये टाकले मात्र पंधरा ते वीस मिनिटांनी बाहेर काढले व त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली व आरोपींना सहकार्य केले   एवढी मोठी गंभीर घटना घडली असतानाही

 पोलिसांनी मात्र बघायची भूमिका घेऊन उलट आरोपींनाच सहकार्य केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांनी आदिवासी कार्यकर्त्यांसमवेत आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन झालेल्या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींवर ‌ विनयभंग तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी व ज्या पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. दरम्यान अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी‌ आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे, कैलास माळी, पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
   ‌.

Post a Comment

0 Comments