मराठा व राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सुधा लॉन्स बेलापूर रोड श्रीरामपूर येथे महामेळावा.

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

मराठा आणि राजपूत समाजाच्या विविध 9 मागण्यांसाठी श्रीरामपूर येथे आगामी 16 डिसेंबर 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर साई सुधा लॉन्स बेलापूर रोड, श्रीरामपूर दुपारी 12 वाजता भव्य 'मराठा-राजपूत क्षत्रिय महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ आणि क्षत्रिय करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामेळावा होत असून, यावेळी समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागण्या शासनासमोर मांडल्या जाणार आहेत.
या महामेळाव्याची पहिली आणि सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी (EWS) असलेले 10 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के करावे, अशी आहे.
मराठा व राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सुधा लॉन्स बेलापूर रोड श्रीरामपूर येथे महामेळावा
या महामेळाव्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील आणि क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक डॉ. राज शेखावत यांनी दिली. मराठा आणि राजपूत या दोन्ही क्षत्रिय समाजाला एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा उद्देश या मेळाव्यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. कृषीराज टकले पाटील म्हणाले, "मराठा आणि राजपूत हे दोन्ही समाज क्षत्रिय परंपरेचे पाईक आहेत आणि त्यांच्या अनेक समस्या समान आहेत. EWS आरक्षण वाढवून 20 टक्के करणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून दोन्ही समाजातील गरीब आणि गरजू तरुणांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये अधिक संधी मिळेल."
मराठा व राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सुधा लॉन्स बेलापूर रोड श्रीरामपूर येथे महामेळावामराठा व राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सुधा लॉन्स बेलापूर रोड श्रीरामपूर येथे महामेळावा
डॉ. राज शेखावत यांनी सांगितले, "आम्ही एकूण 9 महत्त्वाच्या मागण्या घेऊन सरकारकडे जात आहोत, ज्यामध्ये ही EWS आरक्षणाची मागणी अग्रस्थानी आहे. 10 टक्क्यांवरून 20 टक्के आरक्षणामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आणि युवकांना मोठा दिलासा मिळेल."
EWS आरक्षणाव्यतिरिक्त इतर 8 मागण्यांचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यामध्ये शैक्षणिक सवलती, कृषी धोरणे, ऐतिहासिक स्थळांचे जतन, आणि समाजातील तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासारख्या विविध विषयांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या सर्व 9 मागण्या 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यात विस्तृतपणे मांडल्या जातील.
या महामेळाव्यासाठी मराठा आणि राजपूत समाजातील अनेक मान्यवर नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामुळे शासनावर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments