शिर्डी ( प्रतिनिधी)-राहता तालुक्यातील सावळविहीर बुद्रुक येथिल रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेली चित्रकला व रांगोळी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी लहान गट व मोठा गट अशी दोन विभागांमध्ये वर्गवारी करण्यात आली होती. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी पर्यटनाशी संबंधित आकर्षक चित्रे व रांगोळ्या साकारून आपली कला सादर केली. गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्कूल कमिटी सदस्य तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी किरण राजेंद्र आगलावे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यटनाचे महत्त्व आणि सर्जनशीलतेचे मूल्य याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.डहाळे मॅडम व ज्येष्ठ लेखनिक लोखंडे सर यांच्या हस्ते शाॅल व श्रीफळ देऊन किरण राजेंद्र आगलावे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.डहाळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक खेडकर सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री.म्हस्के सर, काळेगोरे सर, खान सर, श्रीमती.कानडे मॅडम, धीवर सर, .वाकचौरे सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments