शिर्डी( प्रतिनिधी) भारताच्या संस्कृतीचे रक्षण व्हावे या हेतूने सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे 13 व 14 डिसेंबर 2025 या दिवशी सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या शंकनाद महोत्सवा साठी विविध महंत, मान्यवर व धर्मप्रेमी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी दिली आहे.
या सनातन धर्म, सेवा आणि भव्यत्तम अध्यात्मिक परंपरेची पताका हातात घेऊन श्री नर्मदेश्वर सेवा धाम निर्मळ पिंपरी चे महंत संन्यासी आत्मारामगिरी महाराज यांचे शंखनादात, “हरिओम”, “श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी”, “नर्मदे हर” जयघोष करत बुधवारी रेल्वेने प्रस्थान झाले.या विशेष प्रसंगी त्यांच्या सोबत ह. प. दत्तात्रय महाराज बहिरट, ह.भ प. कृष्णजी आव्हाड महाराज, तसेच स्वामी ओंकार गिरीजी महाराज उपस्थित होते. ते मथुरा, वृंदावन येथे दर्शन व धर्मसेवा करून नवी दिल्ली येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.प्रवासादरम्यान हे संत मंडळी विविध ठिकाणी धर्मसंवाद, गुरुपरंपरेचे उपदेश, भक्तीमार्ग, साधनारहस्य आणि सनातन धर्माचे मूलभूत तत्त्व यांचे मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी महंत आत्मारामगिरी महाराज यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, प्रथम मथुरा वृंदावन दर्शन होणार आहे, “मथुरा हे केवळ शहर नाही, ती कृष्णतत्त्वाचा जीवंत अनुभव आहे. भक्ती, प्रेम आणि सेवा हीच खरी सनातन परंपरा आहे. समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.”असे सांगत त्यांनी पुढे सांगितले की, नवी दिल्ली येथील होणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, केंद्रीय रक्षाराज्य मंत्री ना. संजय सेठ, सांस्कृतिक मंत्री दिल्ली ना.कपिल मिश्रा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सेव कल्चर सेव भारत चे संस्थापक उदय माहुरकर, सुदर्शन न्युजचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, तसेच गोव्याच्या सनातन आश्रमाच्या श्री सतशक्ती बिंदा सिंगबाळाजी,व तामिळनाडू येथील कांचीपुरमच्या श्रीसत शक्ती अंजली गाडगीळजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.नवी दिल्ली येथील भारत मंडपम हॉल क्रमांक 12 येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्वराज्याची शौर्यगाथा हे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनही येथे 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात येणार आहे.त्यासाठी प्रवेश निशुल्क असून प्रदर्शन पाहण्याची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य दर्शन, सनातन संस्कृती संवाद, सनातन राष्ट्रपत दर्शन, विश्व कल्याणकारी सनातन राष्ट्र, भारत की सुरक्षा, आदी विषयांवर चर्चासत्र होणार आहे. विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांनी दिली आहे.
0 Comments