लोहगाव (वार्ताहर) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया
कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी जनजागृती ही बदलत्या काळानुसार असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी आवड निर्माण व्हायला हवी यासाठी प्रदर्शने, प्रशिक्षण ,चर्चा, प्रात्यक्षिके यांची गरज आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजनारायण पांडुळे यांनी केले.
श्रीमती ॲबर्ट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, भिंगार येथे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रदर्शन आयोजित केले होते.
याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडके हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव पांडुळे होते त्याचबरोबर प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले हे होते . पांडुळे पुढे म्हणाले की रयत शिक्षण संस्था ही बहुजन विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली असून रयत संस्थाही काळानुसार बदल घडविते. रयत शिक्षण संस्थेने बदलत्या काळानुसार बदल घडविले आहेत. वर्गांमध्ये इंटरनेट पॅनल व एआय अभ्यासक्रम हे अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब व चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे स्वप्न प्रत्यक्षात उमटले आहे. विद्यालयाचे ए आय विभाग प्रमुख करवते यांनी प्रदर्शनाचे स्वरूप सांगितले तर प्रास्ताविक प्राचार्य करवते गणपत यांनी केले .
सूत्रसंचालन संदीप अस्वर यांनी केले तर आभार मच्छिंद्र नागरगोजे यांनी मानले यावेळी विभागीय अधिकारी श्री नवनाथ बोडखे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ही देण्यात आल्या. श्री बोडके म्हणाले की रयत नेहमी उपक्रम हाती घेऊन राबवत असतो त्यापैकी कृत्रिम बुद्धिमत्ता हा असून यामुळे रयत शिक्षण संस्थेचे महत्त्व वाढले आहे. जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य सहाय्यक विभागीय अधिकारी श्री प्रमुख तोरणे म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अभ्यासक्रमात समावेश केला असून यामुळे लाभार्थी होण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मासुर कुठला गणेश मस्के अरुण सोनवणे त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments