दिलीप शिंदे
सोयगाव दि.१० - सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथे विविध सामाजिक, भक्तिमय, मनोरंजन व वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबवित महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य मोठी शोभा यात्रा काढण्यात आली होती.यावेळी सरपंच फिरोज खा पठाण, गोविंदा सोनवणे, विठ्ठल जाधव, भगवान तायडे, संजय इंगळे, सुशीलाबाई इंगळे, सुरेखा तायडे, कोकिळाबाई इंगळे आदींसह गावातील महिला व नागरिक हे शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय माता दी फाउंडेशन चे सोनू मंडवे,योगेश कोळी व राहुल सोनवणे यांच्या वतीने आर्केस्टा चे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे नियोजन.
सुनिल मामा सैदाने,अनिल इंगळे,काशिनाथ कांडेलकर, ईश्वर इंगळे,रमेश चक्के, आकाश इंगळे,विक्रांत जोहरे, लखन इंगळे, भारत इंगळे,राजेंद्र इंगळे,शुभम सैदाने,प्रताप सुरडकर,काशिनाथ सोनवणे यांनी केले होते. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी गावातील समस्त नागरिकांनी परिश्रम घेतले होते.
0 Comments