.या पावसामुळे सावळीविहीर बुद्रुक गावातील सिद्धार्थ नगर ,सह गावातील सर्व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या डासांमुळे थंडी ताप डेंगू मलेरिया आदी आजारांचा धोका वाढला आहे. लहान, मुले वृद्ध मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेली दिसत आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये अनेक घरांमध्ये या आजारानीं रुग्ण त्रस्त आहेत. तरी ग्रामपंचायतीने तातडीने डास प्रतिबंधक फवारणी संपूर्ण गावात व उपनगरात करावी. तसेच साठलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडूनही डास प्रतिबंधक जनजागृती व फवारणी व्हावी. त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत . अशी मागणी या पत्रात सामाजिक युवा कार्यकर्ते साहिल म्हस्के यांनी केली आहे.
0 Comments