शिवसेनेचे (उबाठा) शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालय येथे हंबरडा मोर्चा व धरणे आंदोलन-



दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९ - शेतकऱ्यांना कर्जमाफी व हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी दि.०८ बुधवारी सोयगाव येथील तहसील कार्यालयावर शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढीत धरणे आंदोलन करण्यात आले.
       सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीच्या तडाख्यात  पिकांसह शेती वाहून गेल्या, विहिरी ढासळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी व हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.नायब तहसीलदार चेनसिंग बहुरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी 
उप तालुकाप्रमुख सुर्यभान गवळी,तालुका संघटक गुलाबराव कोलते, शहरप्रमुख रविंद्र काटोले, उप शहरप्रमुख दिपक बागुल, सुरेश फुसे,शेषराव पाटील,धरमसिग भाऊ,पंढरी गाडेकर,भगवान पाटील, भगवान पालकर,,शंकर जेठे,बबश रोकडे, योगेश रोकडे, गणेश कापरे,राजु गव्हाड, बावस्कर, अनिल एलीस,विजय राठोड, अतुल बोरसे, गौरव बिंदवाल,राजु मास्ले,प्रताप राठोड, संजु राठोड,ओम काटोले, विजय कदम, माजी नगरसेविका छायाबाई काटोले, राधा मिसाळ,दुलाबाई राठोड, विमलबाई राठोड,सरुबाई राठोड, सुपडाबाई बारी,सुनिताबाई तेली, यांच्या सह तालुक्यातील शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने धरणे आंदोलन मध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments