सावळीविहीर येथील सोमैय्या विद्यामंदिर-लक्ष्मीवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय,  सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई व सोमैया विद्यामंदिर,लक्ष्मीवाडी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे दिनांक 6 व 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पार पडल्या.जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वरजी खुरंगे साहेब, मुख्याध्यापक मारुती  धायताडक यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.
 सदर स्पर्धेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 56 संघ व 650 खेळाडू सहभागी झाले होते. 14,,19 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात या स्पर्धा पार पडल्या.पहिल्यांदाच जिल्हा स्तरीय या स्पर्धा मॅटवर खेळवल्या गेल्या.
ग्रामीण भागातून देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण व्हावेत या हेतूने सन्मानीय समीर सोमैया यांनी सोमैया स्पोर्ट्स अकादमीची निर्मिती केलीआहे. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे..स्पर्धेच्या आयोजनात  अकॅडमीचे प्रमुख एझाझ सर,आदित्य सर, जी. बी. एल. डायरेक्टर तथा विद्यालयाचे सेक्रेटरी श्री. सुहास गोडगे, जिल्हा क्रीडाधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, भाऊराव वीर,रवींद्र नेद्रे सर,देवेंद्र भोळे सर नितीन निकम,रोहन सर,संजय धुमाळ सहकार्य लाभले. मुख्याध्यापक श्री.मारुती धायतडक सर यांच्या उत्साही नेतृत्वाखाली.स्पर्धेचे व्यवस्थापन क्रीडा शिक्षक श्री.अमोलिक  संजय, रुपाली टेके ,दीपिका राक्षे ,शुभांगी राऊत,राहूल पवार सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments