अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातील एका प्रतिष्ठित अशा शाळेमध्ये लिपिकानेच इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करून विनय भंग केल्याची घटना नुकतीच घडली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेतील पीडित विद्यार्थिनीकडून शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार दाखल झाल्यामुळे राहुरी तालुक्यात व संपूर्ण र अहिल्यानगर जिल्ह्यामधून तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,राहुरी तालुक्यातील एका प्रसिद्ध शाळेतील इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन ऑक्टोबर 2025 रोजी शाळेत परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी या शाळेतील लिपिक अमरलाल बाबुलाल दुर्वे यांने बोलवून घेऊन तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल .असे वर्तन केले. छेडछाड केली.अशा प्रकारची तक्रार या विद्यार्थिनीने केल्यानंतर तिच्या पालकांनी शाळेच्या अधिक्षिका व नंतर मुख्याध्यापकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.यासंदर्भात आरपीआयचे विलास नाना साळवे यांनी शाळेत भेट देऊन या पिडीत विद्यार्थिनीला न्याय मिळवून दिला जाईल .असे सांगितले तर या पीडित मुलीच्या आईनेही आपल्या मुलीला न्याय मिळावा. अशी मागणी केली आहे. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित लिपिकला कारणे दाखवा नोटीस दिली असून या लिपिकाने खुलासा दिला आहे. मात्र काही नागरिकांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात गुन्हा दाखल झाला तर शाळेचे नाव खराब होते परंतु काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे की जर अशा घटना या शाळेत घडत असतील तर गुन्हा दाखल होणे गरजेचे असून गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे .अशी मागणी आता होऊ लागली आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुका, व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालक वर्गात मोठी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
0 Comments