लक्ष्मीवाडीच्या सोमैय्या विद्यामंदिर विद्यालयाने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मिळवले अजिंक्यपद!

शिर्डी (राजकुमार गडकरी)- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा  विभाग आयोजित जिल्हा स्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा 3 ते 4 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे  पार पडल्या..या स्पर्धेत सोमैया विद्याविहार मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या 14  वर्षाखालील मुलींच्या संघाने ध्रुव ग्लोबल, आर्मी स्कूल, विखे पाटील विळद घाट,श्रीरामपूर अशा बलाढय संघांचा पराभव करत  संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अजिंक्यपद पटकाविले आहे हा विजयी संघ पुणे विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे. 

सर्व खेळाडूंना विद्यालयाची क्रीडा शिक्षक श्री संजय अमोलिक आणि बॅडमिंटन कोच श्रीमती रूपाली टेके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक शाळा समितीचे सेक्रेटरी मा. सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मारुती  धायतडक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व पालक वर्गांमधून आजी-माजी विद्यार्थ्यांमधून यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments