टाकळीभान प्रतिनिधी- अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था यांची *अहिल्यानगर जिल्हा कार्यकर्ता सभा* आयोजित केली आहे.
सभेपुढील विषय संस्थाचा आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा.शासनाकडून लोहार समाज्यास मिळालेले ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करणेबाबत,
लोहार समाज्यास आरक्षण बाबत चर्चा विनिमय.संस्था पुढील कामकाजबाबत व संस्था वाढीसाठी पुढील वाटचाल ,मराठवाडा विदर्भ येथील अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त लोहार बांधव भगिनींना मदत करणे,
लोहार समाज्यातील घरगुती वैवाहिक तंटे, वाद विवाद, तक्रारी सोडविणे व तंटामुक्ती समिती सदस्य प्रक्षिशन चर्चा विनिमय व मार्गदर्शन करणे,समाज बांधव भगिनीवर इतर समाज कडुन होणारे नाहक त्रास, अत्याचार व दबाव बाबत त्यांना योग्य न्याय मिळणेसाठी पत्रव्यवहार व मार्गदर्शन करणे,मा अध्यक्ष यांच्या परवानगीने आलेले आयत्या वेळचे विषय चर्चा करणे,
*सभा ठिकाण ॐ चैतन्य फर्निचर,शेंडी बायपास रोड,एम आय डी सी, अहिल्यानगर (द्वारकादास शामकुमार दुकानशेजारी)*
रविवार 12 ता, सकाळी 11.30 वाजता होणार आहे तरी सर्वांनी मीटिंगला हजर रहावे. असे आव्हान अशोक पोपळघट , पंडित सोनवणे सुधाकर हारेर , आप्पासो लोहार , विवेक ननावरे , विकास गाडेकर , गणेश भालके ,नारायण हारेर, दिलीप वसव लोहार यांनी केले,
0 Comments