लोणी /प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे
श्रीरामपूर ,शहरात आपल्या दातृत्वासाठी प्रसिद्ध असलेले आणि जनसेवेचा वारसा जपत अविरतपणे प्रभागापुरतच नाही संपूर्ण शहरभर आपले समाजकार्य करणारे दांपत्य श्री दिपक चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ वैशाली चव्हाण यांना नवभारत माध्यम समूहाचा "नवराष्ट्र जनसेवक 2025 " हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चव्हाण दांपत्य हे त्यांच्या धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नगरसेवक असताना भागात अनेक महत्वाची विकासकामे केली. तसेच आधी स्वखर्चाने आणि त्यानंतर शासनाकडून निधी मिळवून दहाव्याच्या ओट्याचा चेहरामोहरा बदलला. येणाऱ्या काळात त्याचे हे कार्य असेच जोमाने सुरू राहो यासाठी त्यांना शुभेच्छा तसेच दोघांनी आपल्या हिंदू धर्माचा असाच प्रसार सुरू ठेवावा असे खालसा दल, च्या वतीने, चंदन सिंग जुनी ,रवी सिंग टाक ,किरण सिंग टाक ,नरसिम्हा सिंग टाक ,यांनी हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments