टाकळीभान प्रतिनिधी : कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या टाकळीभान येथील कु. अल्फीया राजमोहमद शेख या विद्यार्थिनीची १९ वर्षीय महिला वयोगट कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अल्फीयाचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्रा. शाळा टाकळीभान व माध्यमिक शिक्षण इ.५ वी ते १० वी शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले असून ती सध्या राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिंग कॉलेज कोकमठाण येथे बी एस सी नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे .
दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी सिंधुताई विखे पाटील नर्सिंग कॉलेज नाशिक येथे झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत अल्फीयाने दैदिप्यमान कामगिरी केल्याने ती उत्तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांचेकडून कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे,
0 Comments