गंगापूर (तालुका प्रतिनिधी)
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यामध्ये पुरी हे गाव आहे.
पुरी हे गाव खरतर शिवना नदीच्या काठाला वसलेले होते. पण १९७२ च्या दुष्काळामध्ये व पूरग्रस्त परिस्थिती चा आढावा घेता पुरी हे गाव शिवना नदीपासून साधारणता ३ ते ४ किलोमीटर नव्याने पुनरस्थापित करण्यात आले. आज गावामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. अनेक अशा नवनवीन योजना गावांमध्ये राबवण्यात आल्या आहेत. एकंदरीत बघता एक हजार ते बाराशे लोकसंख्या असलेलं पुरी हे गाव.पण आता सध्या पुरी हे गाव घाणीच्या वातावरणाने प्रसिद्ध झाले आहे.
गाव हे आत मधून खूप सुंदर आहे, पण गावाच्या प्रवेशद्वारात घाणीने त्याचे साम्राज्य पसरवले आहे.
पुरी या गावाला हागणदारी मुक्त गाव असा पुरस्कार मिळाला आहे, आज पण गावाच्या प्रवेशद्वारात हागणदारी मुक्त गावाची पाटी लावलेली आहे.पण प्रत्यक्ष बघता गावाच्या दोन्ही बाजूने शौचाने रस्ता भरलेला दिसतो.विचार करण्याची ही गोष्ट आहे की हे हागणदारी मुक्त गाव फक्त कागदावच आहे का?
ज्या ही वेळेस कोणी आवाज उठविला त्या वेळेस त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो.
काही ग्रामपंचायत च्या अधिकाऱ्यांना कोणी विचारलं तर ते उडवाउडवी ची उत्तरे देतात. आम्ही आताचे अधिकारी आहेत याच्या पहिले दुसरे होते त्यांनी का बर केलं नाही.
पुरी गावातील पत्रकार जिवन मावस यांनी या ठिकाणी आवाज उठवला आणि एक ते दोन दिवसांपूर्वी ग्रामसेविका मॅडम यांना फोन करून २६ सप्टेंबर रोजी गट विकास अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. पण अद्याप पर्यंत त्यांचे उत्तर आले नाही किंवा कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
पुरी या गावापासून जो रस्ता जातो तो पैठण या ठिकाणी जातो, आणि ज्यावेळेस गाडी ये जा करते त्यावेळेस गाडीच्या टायर ने ही पूर्ण घाण रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरा समोरून जाते.नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.पुरी गावामध्ये एक उत्कृष्ट प्रकारची शाळा आहे आणि या शाळेमध्ये बाहेर गावाहून बरेचसे विद्यार्थी येतात पण या शौचाने त्यांना देखील या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेस ते अक्षरशः पुरी या गावाला शिव्या देतात. कारण आत मधून जरी हे गाव सुंदर दिसत असेल तरी बाहेरून घाणीने अक्षरशः राज्य सुरू केले आहे.
पुरी हे गाव आजुबाजूच्या गावापेक्षा खूप मोठं गाव आहे.आणि या गावामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात.या गावामध्ये अनेक राजकीय नेते मंडळी ये जा करत असतात. मग एक प्रश्न पडतो की ही घाण फक्त गावातीलच लोकांना किंवा गावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना दिसते का? या राजकीय पुढार्यांना ही घाण दिसत नसेल का?
आता ही बातमी समोर आल्यानंतर तरी प्रशासन आणि या अधिकाऱ्यांना जाग येणार का? की असेच झोपायच नाटक करणार हा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे.गंगापुर तालुक्यातील पुरी गावात घाणीचे साम्राज्य
0 Comments