त्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
दिलीप शिंदे
सोयगाव दि.२९ - अतिवृष्टी व पिकविमा न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत दि.२९ बुधवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. मोजकेच कर्मचारी बघून शेतकरी आक्रमक झाले होते.शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकले होते. तहसीदार मनिषा मेने - जोगदंड निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत कुलूप उघडले जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेत तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या धरला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
यावेळी तहसीलदार व सरकारच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली होती. तब्बल साडे चार तासानंतर तहसीलदार तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्तात दाखल झाल्या यावेळी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन तहसीलदार यांनी स्वीकारले.तीन दिवसात शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास जगप्रसिद्ध अजिंठा बंद करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जाहीर केली होती. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली,त्यातच दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयगाव तालुक्याच्या शेजारी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे अनुदान मिळाले मात्र सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार चैनसुख बहुरे शेतकऱ्यांजवळ आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी बहुरे यांना तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याची विनंती केली मात्र तहसीलदार मनिषा मेने - जोगदंड यांनी प्रतिसाद दिला नाही. अवैधरित्या गौण खनिज उत्खनन, चोरटी वाळू वाहतुकीचे हप्ते जमा करणाऱ्याला तहसीलदार यांना फोन करण्यास सांगा असे संतप्त शेतकऱ्यांनी बहुरे यांना सांगताच ते निःशब्द झाले होते. शेतकरी पूनम परदेशी यांनी बहुरे यांना विचारणा केली, दोन दिवसात सोयगाव तालुक्यात किती मिमी पाऊस झाला यावेळी बहुरे निरुत्तर झाले. सोयगाव तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला होता. २४ तास नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्ती केलेली कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. तहसील कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नाही. यावर अकार्यक्षम तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी काय कारवाई केली हे गुलदस्त्यात आहे.दरम्यान जो पर्यंत तहसीलदार शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी येत नाही तो पर्यंत कुलूप उघडणार नाही व येथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तापले होते. अखेर तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड या नेहमी प्रमाणे दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजता दाखल झाल्या त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत दोन दिवसात खात्यात वर्ग करा,कर्जमाफीचा शासनाने लवकर निर्णय घ्यावा, पीकविमा मंजूर करावा यासह विविध पाच मागण्यांचे निवेदन दिले यावेळी विजय काळे, रवींद्र काळे, ऍड योगेश पाटील, बंटी काळे, राजू दुतोंडे, कृष्णा पाटील, पूनम परदेशीं, पुंडलिक मानकर,अनिल चौधरी, अमोल मापारी, अनिल पाटील,राजू बडक, नितीन पाटील,अजय नेरपगारे, भरत काळे, दिलीप चौधरी, संतोष बोडखे, किशोर मापारी, संतोष सोहनी, जितेंद्र चौधरी, संतोष सोहनी, रामा आगे, राजेंद्र पाटील,भागवत थोटे, विजय गव्हाड,महेश चौधरी, सुरेश मनगटे, शिवाजी चौधरी, आदिसह तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात सोयगाव पोलिस ठाण्याचे सपोनी पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अजय कोळी,सादिक तडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट:- अवैधरित्या गौण खनिज,चोरटी वाळू वाहतूक सर्रास पणे सुरू आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूचे साठे आहेत. यावर तहसीलदार का कारवाई करीत नाही अशी चर्चा तहसील परिसरात सुरू होती. लोकप्रतनिधी व जिल्हाधिकारी यांच्या मेहरबानी मुळे तहसीलदार यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची चर्चा रंगली होती.
0 Comments