स्वराज्य सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच ओमेश जपे यांना जाहीर!--

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील विद्यमान लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे पा. यांना नुकताच स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार 2025 नुकताच जाहीर झाला असून आज गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना हा पुरस्कार अहिल्यानगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
 महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य सरपंच सेवा संघ यादवराव पावसे व बाबासाहेब पावसे‌ यांच्यासह राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात सरपंच उपसरपंच आदींच्या प्रश्ना संदर्भात कार्य करत असून या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी राज्यातील आदर्श व आपल्या गावात चांगल्या काम करणाऱ्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार दिला जातो. यावर्षीही हा स्वराज्य सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये राज्यातील विविध आदर्श सरपंचांना हा पुरस्कार देण्यात येणार असून त्यामध्ये राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ओमेश साहेबराव जपे यांनाही हा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. सावळीविहीर बुद्रुक येथील विद्यमान सरपंच ओमेश जपे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments