टाकळीभान येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी


सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

टाकळीभान प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळीभान पोलीस चौकी समोर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने रन फॉर युनिटी या दौड महो उत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 31  2025 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 8 वाजता  करण्यात आले आहे.

 या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेताना स्पर्धकांनी पांढरा टी-शर्ट व  ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला असावा तरी  सर्व युवक तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे  व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या वतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments