सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच ओमेश जपे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य सरपंच सेवा संघ यादवराव पावसे व बाबासाहेब पावसे यांच्यासह राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात सरपंच उपसरपंच आदींच्या प्रश्ना संदर्भात कार्य करत असून या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी राज्यातील आदर्श व आपल्या गावात चांगल्या काम करणाऱ्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड अहिल्यानगर येथे नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच गावचे मुख्यमंत्री म्हणून समजल्या जाणाऱ्या व गावात आदर्श काम करणाऱ्या राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ओमेश साहेबराव जपे यांनाही हा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान आला. यावेळी स्मरणपत्र, स्मरणचिन्ह देऊन व सर्व मान्यवरांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व विविध सन्मानार्थी, पुरस्कारकर्ते , यांच्यासह सावळीविहीर बुद्रुक येथील उपसरपंच विकास जपे, राहाता बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र जपे,व्हा. चेअरमन सुरेश वाघमारे, कैलास सदाफळ, महेश जमधडे, संजय जपे, दिलीपशेठ बाठीया, सोपानराव पवार, मधुकर वाघमारे, कैलास खरात, संजय वाघमारे,किशोर आगलावे, पत्रकार राजेंद्र गडकरी, राजेंद्र दुनबळे, भारत नेतकर, वाल्मीक बाठीया, संजय वाघमारे ,बाबासाहेब जपे, दिलीप कापसे ,भीमा वर्पे ,कैलास पळसे, दत्तात्रय आगलावे, आनंद जपे, नितीन जपे, सागर जपे, नितीन मातेरे, रतन गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यानंतर ओमेश जपे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामे केली गेली. विविध योजना राबवण्यात आल्या व येत आहेत. या कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाने आदर्श सरपंच पुरस्कार मला दिला. हा पुरस्कार विखे परिवार व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत व सर्व कार्यकर्ते नागरिक यांच्या सहकार्यामुळेच मिळाल्याचे व हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून सर्व गावाचा पुरस्कार आहे असे सांगत स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले व हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणखी चांगले काम करण्याची त्यातून ऊर्जा मिळेल असे सांगितले.आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच ओमेश जपे यांचे विविध क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे.
0 Comments