कर्जत येथे बाहेरच्या गुंडांकून शालेय खेळाडूंना मारहाण त्यात तीन खेळाडू जबर जखमी , टाकळीभान ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

टाकळीभान प्रतिनिधी- कर्जत येथील आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत टाकळीभानच्या खेळाडूंना बाहेरच्या गुंडांकडून मारहाण त्यात तीन खेळाडू गंभीर जखमी झाले आहे, तर अंतिम सामना सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे परत खेळण्यात यावा अन्यथा खेळाडू व टाकळीभान ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आले आहे,

       टाकळीभान१७ वर्ष शालेय जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२५ या समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत येथे सुरू होत्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यांमध्ये समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत व टाकळीभान संघ यांच्यामध्ये अंतिम सामना होता. या अंतिम सामन्यात संघ हरत असल्याचे पाहून बाहेरील गुंडांनी टाकळीभान येथील खेळाडूंना मारहाण करून त्यात श्रेयस संजय ढोले, समर्थ विठ्ठल हेलूदे , अर्जुन द्वारकादास बोडखे, गंभीर जखमी झाले असून, तसेच सामन्यात गोंधळ घालून दबाव तंत्राचा वापर केला. त्यामुळे तो अंतिम सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे खेळण्यात यावा अशी मागणी टाकळीभान येथील खेळाडू व खेळाडू प्रेमी ग्रामस्थ यांनी केली आहे अन्यथा महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ४४ वर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 सविस्तर माहिती अशी की
फायनल सामना न्यू इंग्लिश स्कुल व अण्णासाहेब पा.पटारे कनिष्ठ महा.विद्या. टाकळीभान विरुद्ध समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत. यांच्यात चालू असताना, टाकळीभान संघ- २३ गुण व कर्जत संघ- २१ गुण
      सदर सामना सुरु असताना कर्जत संघातील खेळाडूची टाकळीभान संघाने पकड केली आपण सामना हारणार अस चित्र लक्ष्यात आल्याने समोरील संघाच्या बाहेरील लोकांनी यामध्ये कैलास जगदाळे व त्याच्या सोबत आलेल्या लोकांनी खेळाडूंना जबर मारहाण केली यात श्रेयश संजय ढोले, समर्थ विठ्ठल हेलुदे, अर्जुन द्वारकादास बोडखे ही तीन खेळाडू गंभीर जखमी झाले, अश्या परिस्थितीत इतर खेळाडू धास्तावले व मानसिक दुष्ट्या खचले पुढे सामना इथे खेळलो तर आपल्याला पुन्हा मारतील या भीतीने मूल धास्तावले म्हणून क्रीडा शिक्षक व पालकांनी सदर सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यांगर येथे खेळवण्यात यावी असा अर्ज आयोजकांना व तेथील स्थानिक क्रीडा अधिकारी भाऊराव वीर साहेब यांना दिले परंतु त्यांनी सामना इथेच खेळवा लागेल असा अट्टाहास धरला खेळाडू गांभीर जखमी असताना व स्थानिक लोकांनी गोधळ घातला असताना सदरील सामना तिथे खेळवण धोक्याचं होत म्हणून वारंवार सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यास त्यांनी विरोध केला व टाकळीभान संघ २ गुणांनी आघाडीवर असतानी ही अधिकाऱ्यांनी मनमानी व अधिकाराचा गैरवापर करत टाकळीभान संघ बाद करून कर्जत संघ विजयी घोषित केला या मुळे चांगल्या गुणवंत खेळाडूंवर अन्याय करण्याचे काम त्यांनी केले याची तक्रार कर्जत पोलिस्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे, तसेच जखमी खेळाडूंना अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले तरी खेळाडूचे नुकसान होऊ नये यात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे साहेब यांनी लक्ष घालून खेळाडून न्याय देऊन सदरील सामना पुन्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यात यावा अन्यथा खेळाडू व ग्रामस्थ यांनी राज्य मार्ग क्र.४४ टाकळीभान येथे रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments