शिर्डीला साई संस्थानच्या वतीने पाच व सहा ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य असे श्री साई सोशल मीडिया समिट !

शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी तर्फे “श्री साई सोशल मीडिया समिट – 2025” दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलात भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक समिटमध्ये भारतभरातील विविध प्रांतांतून नामांकित व सोशल मीडियावर सक्रिय असलेले  इन्फ्लुएन्सर्स सहभागी होणार असून, धार्मिक पर्यटनाला डिजिटल माध्यमातून नवी गती देणारा हा सोहळा ठरणार आहे.
 ५०,००० पेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्ससह, साई अभ्यासक, श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित प्रचार प्रसार करणारे यूट्यूबर, यासह ५०,००० पेक्षा कमी फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया क्रिएटर्सना देखील हा सोहळा अनुभवण्यासाठी व यातून प्रेरणा घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
डिजिटल युगातील पहिलं धार्मिक ठिकाणी हे  संमेलन होता असून श्री साईबाबांच्या संदेश, संस्थानचे सेवा कार्य व धार्मिक पर्यटन या विषयांवर विशेष चर्चासत्र व
एआय तंत्रज्ञान व सोशल मीडिया ट्रेंड्सवर मार्गदर्शन सत्र होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास प्रसिद्ध गायक व साईभक्त श्री. सोनू निगम यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते या समिटमध्ये विशेष मार्गदर्शनही करणार आहेत.
श्री साईबाबांच्या विशेष दर्शनाची संधी व श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवाकार्यांची प्रत्यक्ष स्थळभेटी व भजन संध्या आदी कार्यक्रम होणार आहेत. 
देशभरातील ३०० हून अधिक इन्फ्लुएन्सर्स एका व्यासपीठावर येणार असून या कार्यक्रमात
सहभागींसाठी खास प्रिंटेड जूट बॅग,माहिती पुस्तिका, ओळखपत्र, नोटपॅड व पेन
चहा-पान, नाश्ता, जेवण व शिर्डी अंतर्गत वाहन व्यवस्था
स्मृतिचिन्ह म्हणून विशेष “साई ब्लेसिंग बटन”
सहभागी सदस्यांसाठी रील कॉन्टेस्ट या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समिटचे अचूक नियोजन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून
संस्थान तर्फे विविध समित्या स्थापन करून काटेकोर तयारी सुरू असून, या यशस्वी आयोजनासाठी संस्थान जनसंपर्क विभांतर्गत प्रसिद्धी विभाग,  संस्थान अधिकारी व कर्मचारी समित्या, शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ समिती सदस्य मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत आहेत.
या समिटमुळे श्री साईबाबांचे कार्य, संस्थानची सेवा परंपरा व शिर्डीचे धार्मिक महत्त्व डिजिटल माध्यमांतून कोट्यवधी भक्तांपर्यंत पोहोचणार आहे.
तसेच शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळून भाविकांच्या गर्दीत वाढ होण्यास ही संमेलन मदत करणार आहे.
“श्री साई सोशल मीडिया समिट – 2025” हे धार्मिक पर्यटन क्षेत्रात डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करणारे पहिले ऐतिहासिक समिट ठरणार असून, भाविकांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments