*राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण शिर्डीत उत्साहात*सुरू!



   शिर्डी (प्रतिनिधी)राहाता तालुकास्तरीय मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण शिर्डीत उत्साहात पार पडत आहे.
प्राचार्य डा. राजेश बनकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर,जिल्हा समन्वयक श्री.शिवाजी औटी,संपर्क अधिकारी श्रीम.स्मिता कापसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्कर पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड ,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णु कांबळे,श्री.भाऊसाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.
       हे तीन दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी ला अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी दिनांक 25 सप्टेंबर ते  9 आक्टोबर 2025 या कालावधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी येथे आयोजित करण्यात आले आहे.तालुका समन्वयक श्री.सुनिल लोमटे सर यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
       सदर उपक्रम महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष 2025-26 पासून सुरु करण्यात आले आहे.प्रशिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी ,भविष्यात लोकशाहीतील जबाबदार, संवेदनशिल आणि मूल्यधिष्टीत नागरीक व्हावेत हे ध्येय ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात विदयाधर शुक्ल सेवानिवृत्त उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व राज्य सुलभक श्री. बाळासाहेब ठोंबरे यांनी प्रशिक्षण वर्गाला भेटी देवून आनंददायी उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये मुल्यांची रुजवणुक कशी करावी या विषयी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी यांना दोन वेळा चहा, दुपारचे जेवण आणि शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे.
      सुलभक म्हणून तालुक्यातील सुनिल लोमटे,रंगनाथ खेमनर,बालाजी आईंदवाड, दिनकर यादव,लक्ष्मीकांत ईडलवार,सतिष गर्जे, माधुरी ठुबे ,शुभांगी आहेर,रुपाली नाईक,संजय आग्रे,कांचन मोकळ इत्यादीनी अतिशय उत्कृष्ट भुमिका पार पाडत आहेत.

Post a Comment

0 Comments