शिर्डी (प्रतिनिधी) भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने पत्नी सागरिका घाटगे, मुलगा फतेह सिंह खान आणि सासू अपेक्षा यांच्यासह शुक्रवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. साई दर्शनानंतर झहीर खान व त्यांच्या कुटुंबीयांचा साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई शाल व साईबाबा मूर्ती देऊन सत्कार केला.साईबाबांच्या दर्शनानंतर झहीर खान आणि कुटुंबीयांनी साई संस्थानच्या मंदिर परिसरातील देणगी कार्यालयात मेडिकल फंडासाठी तब्बल पाच लाख रुपयांची देणगी दिली.माजी क्रिकेटपटू झहीर खान यांचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे आहे . येत्या 7 ऑक्टोबरला झहीर खानचा वाढदिवस असून त्याआधीच त्यांनं शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं सहकुटुंब दर्शन घेतलं.
साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत 107 वा साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त झहीर खाननं सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी चर्चा करताना झहीर खान म्हणाला, "माझं मूळ गाव श्रीरामपूर असून लहानपणापासून मी साईबाबांचा भक्त आहे. त्याकाळी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत यायचो. पूर्वी दर्शनाची व्यवस्था वेगळी होती.
मंदिराजवळ छोटी दुकानं असायची. आता साईबाबांच्या दर्शनाच्या व्यवस्थेत मोठा बदल झालेला आहे. आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं."असं झहीर खान यावेळी म्हणाला. झहीर खान यापूर्वीही शिर्डीला अनेकवेळा आला आहे.व त्याने मनोभावे दर्शन घेतले आहे.
0 Comments