लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाचे उपशिक्षक विलास गभाले यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था(पु) महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव आयकॉन अवॉर्ड २०२५ यांना प्रदान करण्यात आला.
गभाले यांना शैक्षणिक कार्याबद्दल हा विशेष पुरस्कार झी टॉकीज फेम ह.भ.प. शिवशाहीर कल्याण महाराज काळे आणि राजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याबद्दल स्कूल कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, माधुरी वडघुले, डॉ. शरद दुधाट, संजय डुबे, संजय ठाकरे, नरेन्द्र ठाकरे, बाबासाहेब अंत्रे, सर्व स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमी, सर्व सेवकवृंद आणि विद्यार्थी आदिनी अभिनंदन केले आहे.
0 Comments