कोकमठाण येथे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

श्रीरामपूर: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्यामार्फत आत्मा मलिक संकुल कोकमठाण व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अहिल्यानगर या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने कालपासून २५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सुरू झालेल्या या नवनियुक्त प्रशिक्षणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ८०० पेक्षा अधिक नवनियुक्त  शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर येथील प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या कोकमठाण येथील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षण समन्वयक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनमोल होन यांनी केले. याप्रसंगी डॉ. अरविंद सगभोर यांनी सुलभकांचा परिचय करून दिला. या प्रशिक्षणामध्ये डॉ. शरद दुधाट, जालिंदर गागरे, वैशाली सोनवणे, कैलास वाघमारे, कोंडाजी गडकर, वेरूनिका गायकवाड, विजय कातडे, अभिजीत वाघ, मलिका शेख, सुनीता इंगळे, माधुरी ठुबे, विजय देशमुख, कुलदीप गोसावी, किरण बांडे , महेश पाडेकर, शुभांगी भरसाकळ, प्रतीक्षा काळे,ज्योत्स्ना खोजे, चंद्रशेखर हासे आदी सुलभकांचा वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण भांगरे यांनी अध्यक्ष भाषणातून सांगितले की, नवनियुक्त शिक्षकांची सेवेची सुरुवात प्रभावी होण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.प्रशिक्षणातून विविध घटकांवर मार्गदर्शन करून नव नियुक्त शिक्षकांचा दृष्टिकोन विकसित केला जाणार आहे. डायट च्या माध्यमातून शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश पारखे यांनी आभार मानले..

Post a Comment

0 Comments