सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
शिर्डी ( राजकुमार गडकरी)- विद्यार्थी दशेत कधी शिस्त तर कधी शाळेतील मस्ती, सुट्टी नंतर पहिल्या बाकावर बसण्यासाठी केलेली धडपड, एकत्रितपणे केलेला अभ्यास, ज्यादा तास , नाईट स्टडी, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा शाळेत झालेल्या त्या काळातील विविध विषयांवर गप्पा, चर्चा करत रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या सावळीविहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील सन 2008 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या उत्साहात ,आनंदात यावर्षीचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन पार पाडले.
बरेच दिवसांनी एकत्र स्नेहसंमेलना निमित्त आलेल्या न्यू इंग्लिश स्कूल येथील या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी येथे मनसोक्त गप्पा मारल्या. एकमेकांची खुशाली विचारत एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे सर्वजण विसरून गेले होते. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. मात्र येथे सर्वजण जणू विद्यार्थी म्हणूनच एकत्र आले होते. आपण आज कोण आहोत हे विसरून एक विद्यार्थी म्हणून सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पागोष्टी केल्या. शाळा, शिक्षक, ग्रामस्थ, शाळेत त्यावेळी झालेली विविध कार्यक्र,म कार्यक्रमात घेतलेला सहभाग या सर्वांवर मनसोक्त चर्चा झाली. चहा नाश्ता फराळ झाला. जणू गेले काही वर्ष शाळा परिवारातील हरवलेले सर्व विद्यार्थी मित्र आज एकत्र आले व सर्वांनी मोठ्या आनंदात उत्साहात आणि दिवाळीच्या सणामध्ये हा स्नेहसंमेलनाचा आनंद द्विगणित केला. या संमेलनात या शाळेतील माजी विद्यार्थी किरण राजेंद्र आगलावे, किरण परसराम जपे , आकाश वाघमारे , सचिन विघे, विनोद भोसले, अनिल कापसे, अक्षय चव्हाण, साईप्रसाद पाचोरे, संतोष कुदळे, मंजूर शेख, प्रसाद बाराहाते, ध्यानयोग जपे, हरी गुरसळ, नितीन जासूद, लंकेश गोंदकर, अंजली चव्हाण, कामिनी आरणे, संगीता भोंगळे, प्रीती विघे, विजय माळी ,स्वप्नील वायकर, विकास सुरासे,आदींसह सन २००८ या दहावीच्या बॅचमधील अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. अनेकांनी आपल्या आठवणी यावेळी एकमेकांना शेअर केल्या.
0 Comments