राहाता तहसील कार्यालयावर आदिवासींचा विराट आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा.

राहाता ( प्रतिनिधी)

आदिवासींमधील घुसखोरी बंद करा या प्रमुख मागणीसाठी समस्त राहता तालुका आदिवासी समाजाच्या वतीने शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी राहता तहसील कार्यालयावर विराट आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा धडकनार असल्याची माहिती आदिवासी नेते ज्ञानेश्वर अहिरे यांनी माध्यमांना दिली.
 
श्री. अहिरे म्हणाले की आत्तापर्यंत आदिवासींनी कोणाच्याही ताटातलं हिसकावण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आज आमच्या मुला बाळांच्या अन्नात माती कलवण्याचे षडयंत्र सुरू आहे. बंजारा समाज व धनगर समाज आज आमच्या मुळावर उठला आहे. व आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी मागणी करून वातावरण दूषित करत आहे. त्यामुळे आदिवासी आरक्षणाला वाचवण्यासाठी आदिवासी सज्ज झाला आहे. राहता तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासींची एक वज्रमुठ बांधून आदिवासी मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जोरदार विरोध केला जाणार आहे. आदिवासी समाज आता दाखवून देईल की आमच्या नादाला लागाल तर तुमची बरीगत राहणार नाही. राहता तहसीलवर सकल आदिवासींच्या वतीने जो मोर्चा आयोजित केला आहे तो मोर्चा कोणत्याही संघटनेचा व कोणत्याही नेत्याचा नसेल तर हा मोर्चा समस्त आदिवासींचाच असेल तेव्हा राहता तालुक्यातील आदिवासींना आवाहन आहे की शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हायचे आहे व आपल्या हक्काचे आरक्षण वाचवायचे आहे.आता जर आपण गप्प बसलो तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर याचा खूप मोठा वाईट परिणाम होणार आहे तेव्हा आत्ताच सावध व्हा नाहीतर वेळ गेल्यावर काहीही उपयोग होणार नाही तरी समस्त आदिवासी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी नेते ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments