लोहगाव सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

लोहगाव (वार्ताहर )राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक ६४ वी  सर्वसाधारण सभा. माजी. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माननीय सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरूनाथ चेचरे  यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करण्यात आले.
तद्नंतर दिवंगत झालेल्या मान्यवरांना सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . संस्थेचे सचिव राजेंद्र वसंत चेचरे यांनी अहवालाचे वाचन केले.
याप्रसंगी शालिनीताई विखे म्हणाले की संस्था काढणे सोपी आहे .परंतु त्या आताच्या काळात टिकवणे फार अवघड होऊन बसले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सोसायट्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे सभासदांनी वेळेवर कर्ज भरले पाहिजे. तर संस्था टिकेल असेही त्या यावेळी म्हणाल्या. 
सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे म्हणाले की
सोसायटीची थकबाकी कशी कमी करता येईल यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कर्जमाफी मुळे सभासद कर्ज भरत नाही .त्यामुळे सोसायटी अडचणीत येत आहे त्यामुळे सर्व सभासदांनी कर्ज हे वेळेत भरले पाहिजे . यावर्षी सहा टक्के डेव्हिड्न दिवाळी सणास वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र चंद्रभान  चेचरे.ॲड.बाबासाहेब चेचरे.सरपंच शशिकांत पठारे.उपसरपंच अशोक सुकदेव चेचरे. गणेश चेचरे. सुरेश चेचरे.लहानु चेचरेदत्तात्रय चेचरे.अनिल चेचरे.सौ स्मिता चेचरे.पुष्पलता चेचरे.अनिता तुरकणे.शालिनी चेचरे‌.वसंत चेचरे.बबनराव चेचरे.भाऊसाहेब सखाहारी चेचरे.
विनोद दरंदले. आण्णासाहेब नवसा चेचरे.आण्णासाहेब बबन चेचरे बळीराम चेचरे.ज्ञानदेव दरंदले.बाळासाहेब गंगाधर चेचरे. अशोक रावसाहेब चेचरे.प्रभाकर चेचरे.सोपान चेचरे.किशोर तुरकणे . लक्ष्मण चेचरे.
प्रा.किरण चेचरे शुभम चेचरे . बाळासाहेब दरंरले.बाबासाहेबभाऊरावचेचरे.बबनदरंदले.बाळासाहेब कारभारी चेचरे.संपत चेचरे.रावसाहेब चेचरे.शांताराम शिवराम चेचरे.किरण इनामके.विजय हारिभाऊ चेचरे कृष्णा चेचरे.किशोर दरंदले.अक्षय चेचरे . विठ्ठल चेचरे.रघुनाथ दरंदले.कोडीराम नेहे.आदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचेआभार अक्षय चेचरे व सूत्रसंचालन प्रा किरण चेचरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments