सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर अहवाल



टाकळीभान प्रतिनिधी;-तालुक्यात सर्वत्र पावसामुळे प्रचंड प्रमाणात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी सर्व नागरिकांना कळविणेत येते की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला असून तालुका परिसरात सर्वत्र मोठया प्रमाणात पाउस होत आहे तरी नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी घावरुन न जाता आपल्या आरोग्यावावत खालीलप्रमाणे काळजी घ्यावी तसेच पिण्याचे पाण्याचे सर्व स्त्रोत अतिवृष्टीमुळे दुषित व गढुळ झाले आहेत, त्यामुळे सर्व नागरिकांना व शेतकरी बांधवांना आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे,
      सर्व नागरिकांनी रोज पिण्याचे पाणी उकळुन व गाळून प्यावे,पिण्याच्या पाण्यात रोज मेडीक्लोर टाकून तेच पाणी पिण्यात यावे,जवळच्या आशास्वयंसेविकांकडुन ORS (क्षारसंजीवनी) पाकीट उपलव्ध करुन घ्यावे,जुलाव, उलटी व इतर कोणतेही जलजन्य आजाराचे कोणतेही लक्षणे दिसून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामिण रुग्णालयाशी संपर्क साधावा,प्रवासात शक्यतो वाटलीबंद पाण्याचा वापर करावा, शक्य असल्यास फिल्टरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा,गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे,
   असे आव्हान सार्वजनिक आरोग्य विभाग, अ.नगर, महाराष्ट्र शासना कडून  करण्यात आले आहे, अशी माहिती माळवाडगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ,उन्मेश लोंढे व डॉ, पांडुरंग जाधव यांनी दिली आहे,

Post a Comment

0 Comments