लोणी (प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर,
निर्मळ पिंपरी (ता. राहाता) परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नुसकानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच शासन स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागाचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती डॉ. विकास निर्मळ यांनी (पत्रकार) साबळे शी बोलतांना दिली.
0 Comments