टाकळीभान प्रतिनिधी - दिलीप लोखंडे
मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंग ठाकुर व अन्य आरोपींना पुरव्या अभावी निर्दोष मुक्तता केली,त्याना 17 वर्ष या प्रकरणात अडकून ठेवून भगवा दहशतवाद काहींनी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु,आज त्याना न्यायालयाने निर्दोष सुटका केली भगवा हा अंतकवाद नसतो हे सिद्ध झाले त्याबद्दल न्यायालयाचे महाराजांनी आभार मानले , पहेलगाम मध्ये धर्म विचारून निष्पाप लोकांना मारले आंतकवादाल्या धर्म नसतो आंतकवादी कुठल्याही धर्माचा असु द्या त्याने अन्याय केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे असे मत महाराजानी मांडले .
सनातन धर्म अन्याय शिकवत नाही परंतु अन्याय पण सहन करू नये हे आमच शास्र शिकवते सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते . आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.त्यामुळेच अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
देवगाव शनी व सप्त क्रोशीत गोदावरी तीरी सुरू असलेल्या सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या प्रवचन पुष्पावर ते बोलत होते. भागवत गीतेच्या 11 व्या अध्याय वरील 54 व्या श्लोकावर विवेचन करताना महाराज म्हणाले की,ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत् मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही कर्मानी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत असे महाराज म्हणाले .सकाळी देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज भेट दिली याप्रसंगी शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, डवाळा आश्रमाचे भरत महाराज, मंहत सोमेश्वर महाराज जालना,जनार्दन महाराज मेटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज,विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज , भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे ,अशोक साखर कारखान्याचे संचालक निरंजन मुरकुटे, यांच्या सह 3 ते 4 लाख भाविकांची उपस्थिती होती. . दिवसभर आमटी भाकरीच्या महाप्रसाद सुरू होता.
चौकट-
गिगिनी बुक ऑफ इंडिया मध्ये पोहोचलेला योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह येथील आमटी भाकर प्रसाद वाढण्याची मॅनेजमेंट अखंड हरिनाम सप्ताह चा उद्देश याचबरोबर या सप्ताहाची नोंद घेण्याचे कारण म्हणजे येथील 11,000 हजार टाळकर्यीच्या उपस्थित 4 प्रहारामध्ये 168 तास अखंड भजन,विविध संताचे अभंग भजन , सप्ताह प्रारंभ विना पूजन करून करण्यात आल्यानंतर महंत रामगिरीजी महाराज यांच्या पंचपदीने भजनात सुरुवात होते ती अखंडपणे 168 तास तब्बल सात दिवस टाळ मृदुंग व भजनाच्या निनादाणे हा परिसर भक्तीमय होऊन जातो जणूकाही येथे पंढरीचा उतरले असून साक्षात सप्ताह स्थळी पांडुरंग वास करीत असल्याचा अनुभव भाविकांना येतो . येथील संतांच्या अभंगवाणीस सांप्रदायिक चाली गायनाने श्रवण करणारा भाविक मंत्रमुक्त होत असल्याचे पाहायला मिळते.
0 Comments