एकोपा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; डॉ. सुजय विखे पाटील



शिर्डी(प्रतिनिधी)
विराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक एकतेचा ठाम संदेश दिला.


तत्पूर्वी शिर्डीत पार पडलेल्या साई चरित्र पारायण मिरवणूक सोहळ्यास देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देत भक्तिभावाने सहभाग घेतला. व त्यांनी फुगडीचा आनंद सुद्धा घेतला तसेच भाविकांना नाश्ता वाटप केला.

या कार्यक्रमाला गोपीनाथ बापू, भैय्या शेळके, रवी तात्या गोंदकर,  सर्वोदय सरोदे छोटे बापू, निलेश सरोदे, सुनील , तसेच शिर्डी परिसरातील माता-भगिनी, ग्रामस्थ, युवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमधून मिळालेल्या प्रेरणेतून सामाजिक समतेचा विचार रुजवला गेला पाहिजे.  तसेच निलेश सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन जयंती साजरी करत एकोपा जपल्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

यावेळी ग्रामस्थांनी शिर्डी शहरातील चौकाला लहुजी वस्ताद यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली असून, त्या मागणीचा मान राखत डॉ. विखे पाटील यांनी त्या चौकाच्या नामकरणासाठी नगरपंचायतीमध्ये तातडीने ठराव मंजूर करून पुढील कार्यवाही करत नाव देण्यात येईल असा विश्वास दिला. तसेच समाज मंदिराची देखील मागणी ग्रामस्थांनी केली व तत्काळ प्रतिसाद देत घोषणा देखील डॉ विखे यांनी केली. पण समाजमंदिराचा उपयोग महामानवांच्या कार्याला साजेसा व्हावा, असा संदेशही त्यांनी दिला. समाजामध्ये कोणताही जातीय भेदभाव न ठेवता सर्वांनी मिळून सामाजिक प्रगतीसाठी काम करणे हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments