टाकळीभान प्रतिनिधी-: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये थोर विचारवंत , समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती एन .ए .पालवे, प्रमुख वक्त्या श्रीमती डी . ए . पांढरे , श्रीमती एस . बी . नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर . एम .शिंदे , पर्यवेक्षक एस .एस . जरे , कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती एन .ए .पालवे,प्रमुख वक्त्या डी . ए पांढरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती एन . ए पालवे म्हणाल्या की , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे कार्य महान असून त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती डी . ए . पांढरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली . यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धार्थ शिंदे , समर्थ मुठे , साईराज येवले , प्रशंसा मिरीकर, सर्वेश पवार ,मयुर बोडखे , श्रृती पटारे ,श्रेया शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रृतिका पटारे सूत्रसंचालन रेणुका जगताप तर आभार कुणाल पवार यांनी व्यक्त केले .
0 Comments