हिंदी सक्तीचा निर्णय रद्द – सरकारच्या संवेदनशीलतेस सलाम!तुषार तानाजी कांबळे


नंदकुमार बगाडे 

 खोपोली | रायगड

राज्य शासनाने शाळांमधील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर करून जनभावनेचा सन्मान केला आहे. शासनाने वेळेवर हा निर्णय घेतल्याबद्दल तथ्य समूह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि तुषार तानाजी कांबळे यांनी शासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
तुषार तानाजी कांबळे सचिव - महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय) आठवले श्रमिक ब्रिगेड म्हणाले
 "राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा लोकशाही मूल्यांचा आणि भाषिक वैविध्याचा सन्मान करणारा आहे.
जनतेच्या भावना समजून घेणारे शासन हीच खरी प्रगतीची वाट आहे."
शासनाच्या संवेदनशीलतेमुळे मुलांच्या मातृभाषेतील शिक्षणाचा हक्क अबाधित राहिला असून, विविधतेतील एकतेचा आदर्श घालणाऱ्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा समन्वयाची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

 तथ्य समूह, तथ्य योद्धा सामाजिक संस्था व आरपीआय (आठवले) यांच्यातर्फे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक धोरणे राबवण्यासाठी शासनाला पूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments