विद्यार्थ्यांचा पाया भक्कम असेल तर यश मिळविणे सोपे जाते : पीएसआय सतीश डौले




टाकळीभान प्रतिनिधी-: विद्यार्थ्यांचा दहावी व बारावीपर्यंतचा शैक्षणिक पाया जर भक्कम असेल तर पुढील परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे जाते असे प्रतिपादन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय सतीश डौले यांनी केले. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था व प्राईड अकॅडमी यांच्यावतीने प्राईड प्री स्कूल टाकळीभान येथे आयोजित केलेल्या १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. कार्लस साठे सर होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती व प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.   
           
   या कार्यक्रम प्रसंगी भारतीय ग्राहक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रमेशजी गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्राचार्य जयकर मगर, रमेश श्रीधर गाडे, संदीप जावळे, अनिल कोकणे, पो. ह. प्रशांत रणनवरे, बापूसाहेब नवले आदी प्रमुख उपस्थित होते.

    याप्रसंगी प्राईड अकॅडमी वांगी भेर्डापूर येथील दहावी व बारावी चे प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी, ग्रामीण माध्यमिक विद्यालय, टाकळीभान येथील दहावीतील प्रथम तीन विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पा. ज्यू, कॉलेजचे प्रथम तीन विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रम प्रसंगी ऋषीराज हापसे, गणेश कवडे, मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर कोकणे, बबलू वाघुले, अशोक दाभाडे, रामदास कांबळे, भाऊसाहेब गव्हाणे, शिक्षिका सुप्रिया कोकणे तसेच प्राईड अकॅडमीच्या शिक्षक शिक्षिका, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments